राज्याच्या राजकारणात खळबळ ; ‘शिंदे गट म्हणजेच शिवसेना’; एकनाथ शिंदे गटाने केला दावा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२७ जून । (Eknath Shinde) एकनाथ शिंदे गटाने बंड पुकारल्यापासून आपलाच गट हीच (Shivsena) शिवसेना असल्याचा दावा केला होता. मात्र, दरम्यानच्या काळात या गटाने आता बाळासाहेब शिवसेना असेही गटाचे नामकरण केले होते. पण आता (Cuort) न्यायालयातील सुनावणीनंतर पुन्हा आपला गट हीच शिवसेना आहे. शिवाय जे ह्या गटात नाहीत त्यांनाच पक्षातून काढले जाणार असल्याचा मोठा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत शिंदे गट कोणत्या पक्षात विलिन होणार याला पूर्णविराम मिळाला का असा प्रश्न आहे. दुसरीकडे शिवसेना नेते हे काहीही झाले तरी शिवसेना आपलाच पक्ष राहणार आसल्याचा दावा करीत होते. मात्र, सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर शिंदे गटातील वातावरण बदलले असून जे आमच्यासोबत नाहीत त्यांनाच अपात्र करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता नेमकी शिवसेना आणि पक्ष प्रमुख काय भूमिका घेणार हे पहावे लागणार आहे.

एकनाथ शिंदे सोबत जे आमदार आहेत तीच खरी शिवसेना आहे. एवढेच नाहीतर जे शिंदे गटासोबत नाहीत त्यांनाच अपात्र केले जावे असा दावा केला जाणार आहे.सत्ता स्थापनेचा दावा करण्याचा मार्ग मोकळा झाल्यानंतर या गटात मोठा आत्मविश्वास दिसून येत असून यातूनच शिवसेना हाच आपला पक्ष असल्याचा दावा बंडखोर आमदारांनी केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे गटाचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे.

आतापर्यंत शिंदे गट हा शिवसेना कसा नाही किंवा हे अशक्य असल्याचे शिवसेना नेत्यांकडून वेगवेगळ्या माध्यमातून सांगितले जात होते. एकतर शिंदे गटाला आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल अन्यथा इतर पक्षात सामील व्हावे लागेल असे खुद्द आदित्य ठाकरे तसेच शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी देखील स्पष्ट केले होते. मात्र, सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर शिंदे गटाने आपली भूमिका बदलली आहे.

कोर्टात सुनावणीनंतर शिंदे गटाचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाल्याचा दावा केला जात आहे. असे असतानाच दुसरीकडे शिंदे गट हीच शिवसेना असल्याचा दावाही करण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेना आता काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मात्र, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर शिंदे गट आणि भाजपामध्ये मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुले सत्तास्थापनेची काय समीकरणे आता समोर येणार हे पहावे लागणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *