महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२९ जून । एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात सत्तासंघर्ष सुरूयं. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दिल्लीवरुन परतल्यानंतर थेट राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर गेले होते. आता सत्तास्थापनेसाठी हालचालींना वेग आलायं. संपूर्ण भाजपा कामाला लागलीयं. इतकेच नाही तर सर्व आमदारांना मुंबई गाठण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. भाजपाच्या सर्व आमदारांचा रात्रीचा मुक्काम प्रेसिडेंशियल हॉटेलवर असणार आहे.
