महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३० जून । बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच बुधवारी रात्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिला. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपाच्या (BJP) गोटात मात्र जल्लोष दिसून आला. या जल्लोषावर बंडखोर आमदार दीपक केसरक यांनी अक्षेप घेतला आहे. अशा पद्धतीने जल्लोष करणे योग्य नसल्याचे केसरकर यांनी म्हटले आहे. आम्ही हे बंड सत्तेसाठी केलेलं नाही. मात्र पक्षाचा जो मुळ विचार आहे तो मागे पडता कामा नये असे आम्हाला वाटत असल्याचे केसरकर यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपाच्या गोटात जो जल्लोष झाला, तो अयोग्य असल्याचे केसरकर यांनी म्हटले आहे. भाजपाच्या गोटात जो काही जल्लोष झाला, ज्या काही प्रतिक्रिया आल्या त्यामुळे आम्ही दुखावलो गेलो असल्याची भावना केसरकर यांनी व्यक्त केली आहे.
मी खरं सांगतो आम्ही सत्तेसाठी बंडखोरी केलेली नाही. मंत्रिपदं असणारी लोकं कशाला बंड करतील? सरकार येतात जातात मात्र विचार टिकवायचा असतो, या भावनेतून हे सर्व घडले आहे. यामध्ये उद्धव ठाकरे हे कुठेही दुखावले गेले नाही पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपाच्या गोटात जो जल्लोष झाला त्यामुळे आम्ही दुखावले गेलो आहोत. नेत्यांनी बोलताना, प्रतिक्रिया देताना भान बाळगले पाहिजे. बोलण्यासाठी पक्षांनी जे काही अधिकृत प्रवक्ते नेमले आहेत त्यांनीच प्रतिक्रिया देणे अपेक्षीत आहे. कोणाचीही मनं दुखावायची नाहीत हे तत्त्व जसे आम्ही पाळतो तसे ते तुम्ही देखील पाळावे असे केसरकर यांनी म्हटले आहे.