नवरात्रीच्या जल्लोषातून रणशिंगाचा नाद – दिनेश अण्णा कुऱ्हाडे थेट राजकारणाच्या रणांगणात!

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड, दि. २ ऑक्टोबर २०२५ बालाजीनगरच्या दहा दिवसांच्या नवरात्र महाउत्सवाने यंदा फक्त दांडियाच नव्हे, तर थेट राजकीय गर्भाही फिरवला! दांडियाच्या ठेक्यावर झुलत असतानाच दिनेश अण्णा कुऱ्हाडे यांनी प्रभाग क्रमांक आठ मधून पालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आणि मैदानातला रंग एकदमच बदलून टाकला.

दहा दिवसांचा जल्लोष, रोज पैठणी-स्मार्टवॉच-स्कूलबॅग्सचा पाऊस, लकी ड्रॉमधून गिफ्ट्स, आणि अखेरच्या दिवशी तर पावसासकट बक्षिसांचा अक्षरशः “धबधबा”! याला म्हणतात उत्सवाला उत्सवाचा मेळा! आयोजकांच्या नियोजनाची पकड पाहून मान्यवरांना अक्षरशः डोळ्यांत बोटं घालून दाखवावं लागलं – “हो बुवा, असंही नियोजन होतं!”

विशेष म्हणजे, उत्सव हा केवळ हिंदू-मुस्लिम-भेदाभेद पलीकडचा ठरला. दहा दिवस मुस्लिम भगिनी दांडियात रमल्या आणि संपूर्ण बालाजीनगर एकाच तालावर नाचलं. हा नजारा पाहून एकच वाक्य सुचतं – भेदभाव कुणाला वेळ आहे हो, इथे लोक नाचायलाच व्यस्त आहेत!

बक्षिसंही थाटातली – पहिलं बक्षीस थेट फ्रीज, दुसरं वाॅशिंग मशिन, तिसरं एलईडी टीव्ही, नंतर स्मार्टफोन, होम थिएटर, गॅस शेगडी, मिक्सर… एवढं सगळं पाहून खेळाडूंच्या डोळ्यांत दांडियापेक्षा जास्त चमक होती. पत्रकार बांधवांनाही यथोचित सन्मान देण्यात आला – हे विशेष नमूद करावं लागेल, कारण पत्रकारांना सन्मानित करायची पद्धत सहसा कुठे दिसत नाही!

या संपूर्ण सोहळ्यानंतर कुऱ्हाडे अण्णांनी पोलिस प्रशासनाला धन्यवाद देऊन दसरा व धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आणि हो, त्याच औचित्याने राजकीय दसऱ्याचीही सुरुवात करून टाकली. रणशिंग फुंकून आता थेट प्रभाग आठच्या राजकीय रणांगणात उडी घेतली.

कार्यक्रमात उद्योजक शंकरशेठ कुऱ्हाडे, पिंटूभाऊ जाधव, सागरभाऊ ओरसे, सुनीलभाऊ वाघमारे, मोहम्मदभाई शहा, शेखलालभाई नदाफ, चांदभाई शेख, राजूशेठ पठाण, रामांना विटकर, भीमाशेट लष्करे, दुर्गादास जाधव, सदा कुसाळे, राजू गुंजाळ, कामराज विटकर, लक्ष्मण विटकर, लालाभाऊ जाधव, अभिमान तांगडे, बाळू शिंदे यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या मीनाताई तांगडे, शालनताई सूर्यवंशी, जयश्रीताई मस्के, मनीषाताई बनसोडे आणि हजारोंच्या संख्येने बालाजीनगरवासीय उपस्थित होते.

एकूण काय, नवरात्र संपलं खरं, पण बालाजीनगरच्या राजकारणातलं नवं नवरात्र आता सुरु झालंय. कुऱ्हाडे अण्णांचं रणशिंग फुंकलंय, आता प्रभाग आठमध्ये निवडणूक म्हणजे खरीच दांडियाची धमाल होणार – फरक फक्त एवढाच, की इथे बक्षिसं नसून “मतांचा पाऊस” कोसळणार आहे!

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *