संशोधकांच्या मते, 2022 पर्यंत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे हितावह

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई – कोरोना व्हायरसने संपूर्ण जगालाच सूक्ष्म जीवजंतूंपासून सावध केले आहे. या व्हायरसचा प्रकोप रोखण्यासाठी भारतात आधी 21 दिवसांचा आणि नंतर 19 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. सोशल डिस्टन्सिंग हे अशा काळात अतिशय महत्त्वाचे बनले आहे. मात्र, असे अंतर ठेवून राहणे केवळ आताच नव्हे तर भविष्यातही सांभाळावे लागणार आहे. संशोधकांच्या मते, 2022 पर्यंत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे हितावह आहे. अन्यथा भविष्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो!

‘सायन्स’ या नियतकालिकात याबाबतची माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की केवळ एकदाच लॉकडाऊन करून साथीवर नियंत्रण ठेवणे कठीण आहे. प्रतिबंधात्मक उपायांशिवाय कोरोना विषाणूची दुसरी लाट अधिक भयानक असू शकते. हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे एपिडेमिओलॉजिस्ट मार्क लिपिसच यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की दोन गोष्टी झाल्या की संसर्ग पसरतो…एक संक्रमित व्यक्‍ती आणि दुसरी कमकुवत रोगप्रतिकारक शक्‍ती. जगातील बहुतेक लोकसंख्येमध्ये विषाणूविरुद्ध प्रतिकारकशक्‍ती विकसित होईपर्यंत मोठी लोकसंख्या असुरक्षित होण्याची शक्यता आहे. जर 2025 पर्यंत यावरील रामबाण लस शोधली नाही तर कोरोना विषाणू पुन्हा संपूर्ण जगभर पसरेल. सरकारने काही वर्षे कधी सक्‍ती तर कधी थोडासा दिलासा देऊन सोशल डिस्टन्सिंग सुरू ठेवले पाहिजे. लस आणि योग्य उपचाराची माहिती मिळेपर्यंत 2022 पर्यंत सोशल डिस्टन्सिंग ठेवावे लागू शकते. जर लोकांची प्रतिकारक शक्‍ती केवळ एक वर्षासाठी कायम राहिली तर इतर कोरोना विषाणूंप्रमाणे ही रोगराई देखील दरवर्षी परत येऊ शकते. त्यामुळे भविष्यातही मानवजातीला योग्य ती खबरदारी घेऊनच राहावे लागू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *