पुणे : कोरेगाव पार्क परिसरातील रेस्टो बारवर छापा ; मद्य साठा जप्त

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पुणे- लॉकडाऊनच्या काळातदेखील चोरीछुपे मद्य विक्री करणाऱ्या कोरेगाव पार्क परिसरातील एका रेस्टो बारवर गुन्हे शाखेच्या खंडणी व अंमलीपदार्थ विरोधी पथकाने छापा टाकला. याप्रकरणी, कलीमउद्दीन रियाजुद्दीन शेख (रा. लेन नंबर ४ कोरेगाव पार्क ) याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध कोरेगाव पोलिस ठाण्यात भा.दं.वि क. १८८, २६९, २७०,२७३ , प्रोहिबिशन ऍक्ट क .६५(ई) .८२ ,राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे क. ५१(१)(ब), महाराष्ट्र कोविड १९ नियम २०२० चे क ११, संसर्गजन्य रोग कायदा १८९७ चे क. ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी पोलिसांनी ८ लाख ८४ हजारांचा मद्यसाठा जप्त केला आहे.

अप्पर पोलिस आयुक्त अशोक मोराळे यांना माहिती मिळाली की, कोरेगाव पार्क याठिकाणी लॉकडाउन काळातही चोरून दारूची विक्री सुरू आहे. त्यानुसार बनावट ग्राहक पाठवून खात्री केल्यानंतर पोलिस उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक पोलिस आयुक्त शिवाजी पवार यांच्या उपस्थितीत पोलिस उपनिरीक्षक निलेशकुमार महाडिक, कर्मचारी मगर, चिखले, बागवान यांच्यासह सतरंज रेस्टो बार येथे दारूबंदी उत्पादन शुल्क खात्याचे सहाय्यक आयुक्त संजय पाटील यांच्या पथकांनी छापा टाकून ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *