चिंताजनक : पुण्यात दिवसभरात आढळले कोरोनाचे ६५ रुग्ण;

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन -पुणे : पुण्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा गुरुवारी (ता.16) झपाट्याने वाढला असून, दिवसभरात नव्या 65 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे पुण्यातील रुग्णांची संख्या 442 झाली आहे. दिवसभरात चौघांचा मृत्यू झाल्याने ही संख्या 42 पर्यंत पोचली आहे. त्याचवेळी 7 जणांची प्रकृती गंभीर असल्याचेही महापालिकेने आपल्या अहवालात नमूद केले आहे. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश असून एका 38 वर्षाच्या महिलाचा बळी गेला आहे. मृत पावलेल्या चौघांनाही उच्चरक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता.विभागातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 518 वर पोचल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे विभागात एकूण 518 कोरोना बाधित रुग्ण असून, एकूण 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 463 बाधित रुग्ण त्यापैकी 42 रुग्णाना घरी सोडण्यात आले आहेत. तसेच, 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 11 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 12 बाधित रुग्ण आढळून आले असून, एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 26 रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी 25 रुग्णांला घरी सोडण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्हयात 6 बाधित रुग्ण आहेत.

पुणे विभागात 6 हजार 781 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 6 हजार 383 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर, 398 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 518 नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *