‘उद्धव ठाकरे राजीनामा देणार हे शरद पवारांनी तेव्हाच ओळखलं होतं’

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३० जून । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्रीपद आणि विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा देऊन सर्वांनाच धक्का दिला होता. उद्धव ठाकरे राजीनामा देतील अशी चर्चा असली तरी ते शेवटपर्यंत लढून विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाईल, अशी आशाही अनेकांना होती. मात्र, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अचानक एक्झिट घेतली. उद्धव ठाकरे हे लगेचच राजीनामा देतील याची कल्पना महाविकास आघाडीतील मित्रपक्षच काय पण शरद पवार यांनाही नव्हती, असे आता दिसत आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. (CM Uddhav Thackeray Resigns)

यावेळी जयंत पाटील यांनी आपल्या उद्धव ठाकरे राजीनामा देतील, याबाबत कल्पना नसल्याचे सांगितले. मी आणि शरद पवार (Sharad Pawar) एकत्रच टीव्ही पाहत होतो. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर शरद पवार साहेबांनी काही विशेष प्रतिक्रिया दिली नाही. पण उद्धव ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केल्यानंतर त्यांचा सूर पाहूनच शरद पवार यांनी ते मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील, हे ओळखले होते, असे जयंत पाटील यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *