महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३० जून । एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात वादळ आलं. याच बंडखोरीमुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा (Uddhav Thackeray resignation as Chief Minister)द्यावा लागला. बुधवारी उशीरा रात्री ठाकरेंनी राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्त केला. ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर, एकनाथ शिंदेंनी(Eknath Shinde) पहिल्यांदाच प्रतिक्रीया व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर शिंदे गट भाजपसोबत जाणार अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान,भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका. असे शिंदे यांनी ट्विट करत स्पष्ट केलं.
भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 30, 2022
महाविकास आघाडी सरकार अडीच वर्षांनंतर शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीमुळं कोसळलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात पुढच्या एक ते दोन दिवसात फडणवीसांच्या शपथविधीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यादरम्यान, मंत्रिमंडळ कशा प्रकारे असेल याची देखील चर्चा सुरू आहे.