धक्कातंत्र ; एकनाथ शिंदे होणार महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री ; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३० जून ।  एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होतील, अशी धक्कादायक घोषणा गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते राजभवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. फडणवीस आणि शिंदे यांनी गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

एकनाथ शिंदे हे नवे मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांनी केली. राजभवनात राज्यपालांची भेट घेतल्यानंतर विधानभवनात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना ५६ जागा जिंकली. भाजपला १०५ जागा मिळाल्या. पंतप्रधानांनी भाजपचा मुख्यमंत्री होईल, अशी घोषणा केली. मात्र, तेव्हा निकाल आल्यानंतर तेव्हाचे आमचे मित्र आणि नेते यांनी शब्द फिरवला. विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांचा अजन्म ज्यांचा विरोध केला, अशा काँग्रेस राष्ट्रवादीसोबत युती केली. भारतीय जनता पक्षाला बाहेर ठेवले. हा जनमताचा अपमान होता.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जनतेने महाविकास आघाडीला मत दिले नव्हते. भाजप युतीला दिले होते. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे गटनेते आहेत. आमच्याच मतदार संघात हरलेल्या विरोधकांना निधी दिला जात असेल, तर कशाच्या जोरावर लढायचा हा प्रश्न शिवसेना आमदारांसमोर होता. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी सोबतची युती तोडा, असा निर्णय आमदारांनी घेतला. मात्र, दुर्दैवाने उद्धव ठाकरे यांनी आमदारांऐवजी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना प्राधान्य दिले.

देवेंद्र फडणीस म्हणाले की, उद्धवजींनी राजीनामा दिल्यानंतर आम्ही महाराष्ट्राला अल्टरनेट गर्व्हमेंट देतोय. तसा शब्द आम्ही पूर्वीच दिला होता. शिवसेनेचा एक गट, अपक्ष आमच्यासोबत आहेत. तसे एक पत्र राज्यपालांना दिले आहे.

देवेंद्र फडणीस म्हणाले की, आम्ही सत्तेच्या पाठिमागे नाही आहोत. ही तत्त्वाची आणि हिंदुत्वाची लढाई आहे. त्यामुळे भाजपने निर्णय हा घेतला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *