रतन टाटा यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार द्या, सोशल मीडियावर ऑनलाईन याचिकेला जगभरातून तब्बल 2 लाख 40 हजार लोकांचा पाठिंबा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई – टाटा ग्रुपचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी एक ऑनलाईन याचिका करण्यात आली आहे. एका नेटकऱ्याने ही याचिका केली असल्याची माहिती आहे. चेंज डॉट ओराजी या वेबसाईटच्या माध्यमातून ही याचिका दाखल करण्यात आली आहे. संपूर्ण जगभरातून तब्बल 2 लाख 40 हजार लोकांनी याला सोशल मीडियावर पाठिंबा दर्शवला असून अजूनही ही संख्या वाढत चालली आहे.या ऑनलाईन याचिकेमधून रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे. यामध्ये लिहलं आहे की, ‘रतन टाटा हे परोपकार आणि मानवतेचे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी अनेक संशोधनासाठी, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्था उभारण्यासाठी आर्थिक मदत केली.’ दरम्यान, या याचिकेमध्ये रतन टाटा यांनी मदत केलेल्या सर्व संस्थांची यादी करण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या समाजसेवेची देखील लिस्ट देण्यात आली आहे.

ख्यातनाम उद्योगपती रतन टाटा यांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत मदतीचा हात पुढे केलाय. त्यासाठी टाटा ट्रस्ट आणि उद्योगसमुहाच्या वतीने त्यांनी तब्बल 1 हजार 500 कोटींची मदत देणार असल्याचं जाहीर केलं आहे. देश आणि जगासमोरचं संकट हे अतिशय मोठं आहे. त्याच्याविरुद्ध लढण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. ती काळाची गरज आहे. मानवते समोरचं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे असंही रतन टाटांनी म्हटलं आहे.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत 1 हजार 500 कोटींच दान दिल्यानंतर टाटा समुहाने आणखी एक मोठा निर्णय घेतलाय. त्यांच्या ताज ग्रुपच्या मुंबईतल्या फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये आता कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टर्सना रुम्स मिळणार आहेत. अहोरात्र सेवा देणारे डॉक्टर्स जर आपल्या कुटुंबीयांसोबत राहिले तर त्यांना इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. त्यामुळे त्यांना वेगळं राहण्याची गरज असते. त्यामुळे समुहाने हा निर्णय घेतला आहे. कुलाब्यातलं हॉटेल ताज महल, बांद्र्यातलं ताज लँड्स, सांताक्रुजमधलं हॉटेल ताज आणि हॉटेल प्रेसिडंट या हॉटेल्समध्ये डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी या रुम्स देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *