अमेरिकेकडून भारताला ५.९ मिलियन डॉलरची मदत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई – कोरोना व्हायरसचं संपूर्ण जगावर संकट ओढळवलं आहे. या संकटात भारताने हायड्रॉक्सीक्लोकोक्वीन पाठवून अमेरिकेची मदत केली. यानंतर आता अमेरिकेने भारताला मदत करण्यासाठी हात पुढे केला आहे. अमेरिकेना कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी भारताला आरोग्य सहाय्यता रूपात ५.९ मिलियन डॉलरची मदत केली आहे. अमेरिकेच्या परदेश मंत्रालयाने सांगितले की,’या पैशांचा वापर हा भारतात कोरोना पीडितांच्या मदतीसाठी वापरावा. त्यासंदर्भातील जागरूकता अभियान आणि त्याच्या उपाययोजनांकरता याचा वापर करा. या सहायता राशीचा वापर हा त्याच्या आपातकालीन तयारीकरता करू शकतात.

अमेरिकेकडून गेल्या २० वर्षात दिल्या जाणाऱ्या २.८ बिलियन डॉलरच्या सहायता निधीतील एक भाग आहे. १.४ बिलियन डॉलर स्वास्थ सहाय्यता रूपात दिला जात आहे. परदेश मंत्रालय आणि यूएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटने आपातकालीन स्वास्थ, आर्थिक सहायताकरता ५०८ मिलियन डॉलर खर्च करण्याची तयारी दाखवली आहे. जगभरात कोरोनाचा थैमान सुरू आहे. या जागतिक साथीच्या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिका सुरूवातीपासूनच एनजीओंना सहायता राशी प्रदान करत आहे. ही राशी आतापर्यंतची सर्वाधिक राशी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *