![]()
महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई – कोरोनामुळे अनेक उद्योग-धंदे बंद आहेत. मोठा आर्थिक फटका बसत आहे. अर्थव्यवस्थेला बुस्टर डोस देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अनेक घोषणा केल्या आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संकटात अर्थव्यवस्थेला ऊर्जित अवस्था मिळण्याचे संकेत मिळत आहेत. त्यातच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) आपल्या रिव्हर्स रेपो दरात .२५ टक्के कपात केली आहे. त्यामुळे याचा लाभ हा कर्जदारांना होणार आहे. रिव्हर्स रेपो दरात कपात केल्यामुळे होम लोन आणि कार लोन स्वस्त होण्याची शक्यता आहे. आता बँका काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.
#BreakingNews | रिवर्स रेपो रेट में 0.25% की कटौती, रिवर्स रेपो रेट 4% से घटकर 3.75%: शक्तिकांत दास, RBI गवर्नर #ZeeBusinessNumber1 #RepoRate @AnilSinghvi_ #ShaktikantaDas #RBI pic.twitter.com/HJTTKoDriB
— Zee Business (@ZeeBusiness) April 17, 2020
