महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ जुलै । शिवसेना कधीही संपणार नाही. शिवसेना दुपटीपेक्षाही जास्त ताकद घेऊन विधानभवनात येईल आणि भगवा फडकवेल, असा विश्वास शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. तसेच राज्यात मध्यवर्ती निवडणुका लागण्याची शक्यता असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. २० मे रोजी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री होण्याबाबत विचारलं होते, असा दावाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला.
आदित्य ठाकरे माध्यमांशी संवाद साधत असताना अचानक शिंदे गटातील आमदार प्रकाश सुर्वे समोर आले. यावेळी दोघांची भेट झाली. त्यानंतर प्रकाश सुर्वे आणि आदित्य ठाकरे यांचा विधानभवनाबाहेर संवाद झाला. माझं तुमच्यावर खूप प्रेम होतं. तुम्हालाही माहिती आहे, असं आदित्य ठाकरे प्रकाश सुर्वेना म्हणाले. यावेळी आदित्य ठाकरे हे प्रकाश सुर्वेंशी संवाद साधताना भावूक झाल्याचे दिसून आले.
मुंबई- शिंदे गटातील बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांचा विधानभवनाबाहेर संवाद झाला. त्यावेळी आदित्य ठाकरे भावूक झाल्याचे दिसून आले. pic.twitter.com/0bmMiFA5xo
— Lokmat (@lokmat) July 4, 2022