महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ जुलै । आम्ही बंड केला नसून उठाव केला आहे. एकनाथ शिंदे सुरतला गेले होते, ते गेल्यानंतर आम्ही 20 आमदार होतो, साहेबांकडे गेलो होतो. ‘असं असं शिंदे साहेब म्हणत आहे. त्यांचं ऐकून तरी घ्या’, त्यावेळी तुम्हाला जायचं जायचं तर जा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पण असं होत नाही, असा खुलासाच शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांनी केला.
एकनाथ शिंदे सरकारने बहुमत जिंकल्यानंतर अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात आला. यावर शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी आपल्या भावनाला वाट मोकळी करून दिली.
‘शिंदे साहेब गेल्यानंतर आम्ही 20 आमदार होतो, साहेबांकडे गेलो होतो. असं असं शिंदे साहेब म्हणत आहे. त्यांचं ऐकून तरी घ्या, त्यावेळी तुम्हाला जायचं जायचं तर जा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पण असं होत नाही. हीच आमची निष्ठा, 35-35 वर्ष आम्ही शिवसेनेत घातली आहे. बाळासाहेब हे आमच्या ह्रदयात राहतील. आम्ही योग्यच केलं आहे, भाजप-शिवसेनेची युती राहणार होती, तेच आम्ही केलं आहे, असंही गुलाबराव पाटलांनी ठणकावून सांगितलं.