महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ जुलै । महागाईने होरपळणाऱ्या सर्व सामान्य जनतेला पुन्हा एकदा भुर्दंड बसणार आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या (Gas cylinder price hike ) दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. 14 किलोच्या घरगुती सिलेंडर 50 रुपयांनी महागले आहे. त्यामुळे सिलेंडर (Gas cylinder rate ) घेण्यासाठी आता 1 हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहे.
महागाई काही कमी होण्याचे नाव घेत नाही. दर महिन्यात सिलेंडरच्या दरात सारखी वाढ होत चालली आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ झाली आहे. दिल्लीत 14 KG LPG सिलेंडरची किंमत 1053 रुपये आहे. तर मुंबईत 1052.50 रुपये मोजावे लागणार आहे. तर कोलकात्यात 1079 रुपये आणि चेन्नईमध्ये 1068.50 रुपये दर झाला आहे.
1 मे रोजी सरकारी तेल कंपन्यांनी कमर्शियल एलपीजी सिलेंडरचे दर वाढवले होते. त्यावेळी प्रति सिलेंडर 102.50 रुपये किमती वाढवण्यात आल्या होत्या. त्याशिवाय त्याआधी 1 एप्रिल रोजी 19 किलोच्या कमर्शियल एलपीजी दरात 250 रुपयांची वाढ करण्यात आली होती.
तुम्हाला तुमच्या शहरातील गॅस सिलिंडरचे सध्याचे दर जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही सरकारी तेल कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्याविषयी माहिती घेऊ शकता. घरगुती गॅस सिलेंडरचा दर तपासण्यासाठी सरकारी तेल कंपनी IOC च्या वेबसाइटवर जावं लागेल. इथे कंपन्या दर महिन्याला नवे दर जारी करते. यासाठी तुम्हाला https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या लिंकवर क्लिक करावं लागेल. दर महिन्याच्या एक तारखेला गॅस सिलिंडरचे नवे दर (Price) जाहीर केले जातात.