महागाईतून दिलासा मिळणार ? ; डाळीच्या किमती 10 टक्क्यांनी घसरल्या, भाज्याही स्वस्त होतील

 71 total views

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ जुलै । देशात महागाईने मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. किरकोळ महागाईच्या आकडेवारीत सुमारे ४०% भागीदारी असणारी तृणधान्ये, तेल आणि कडधान्ये यांसारख्या कृषी वस्तू, २०२२च्या विक्रमी पातळीपासून २१ टक्क्यांनी घसरल्या आहेत. त्यांच्या किमती सर्वकालीन उच्च पातळीपासून ५६% पेक्षा जास्त खाली आल्या. तांदळाचे दर स्थिर राहिले आहेत. खरं तर, जागतिक अर्थव्यवस्थेत मंदीच्या भीतीमुळे गेल्या दोन महिन्यात जगभरात कमोडिटीचे भाव वेगाने उतरले. केडिया कमोडिटीचे डायरेक्टर अजय केडिया यांच्या मते, घसरणीचा कल कायम राहील. परिणाम किरकोळ महागाईवर होईल. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीनुसार, मान्सूनचा वाढेल तसे बाजारात कृषी मालाच्या किमती वाढतील,भाजीपालाही स्वस्त होईल.

कमी उत्पादनामुळे गव्हाचे भाव घसरले
ओरिगो ई-मंडीचे सहाय्यक महाव्यवस्थापक (कमोडिटी रिसर्च) तरुण सत्संगी यांच्या मते, निर्यातीवर बंदीमुळे गव्हाचे भाव घसरले. मात्र गेल्या वर्षी कमी पिकांमुळे यात घट मर्यादित राहिली. दुसरीकडे इंडोनेशियातून पामतेलाच्या निर्यातीवरील बंदी उठल्यानंतर पुरवठा वाढल्याने खाद्यतेल आणि तेलबियांच्या किमती दबावाखाली आहेत. युक्रेनमधून सूर्यफूल तेलाचा पुरवठा वाढल्याचा परिणाम तेल बाजारावरही दिसून येत आहे.

कृषी मालाच्या घसरणीची ७ प्रमुख कारणे
जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदीच्या भीतीचा परिणाम भावनेवर
जगभरातील वाढत्या व्याजदरामुळे बाजारातून जादा रोख काढून घेणे
मालवाहतूक स्वस्त होणे, २३ मेपासून मालवाहतूक निर्देशांक ३६% खाली आला
मेनंतर कच्च्या तेलाच्या किमतीत घसरणीचा परिणाम
पाऊस पडल्याने देशात पिकांच्या पेरणीत वाढ झाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *