Gold Price : सोने-चांदी भावात घसरण ; पहा आजचा भाव

 137 total views

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ जुलै । आता बातमी आहे सर्वसामान्यांना दिलासा देणारी. कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झाली आहे. ब्रेंट क्रूडच्या किंमती 8 टक्क्यांनी घसरल्याने एका बॅरलचा दर 105 डॉलरच्या जवळ गेला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात तेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. तर यासोबत सोने- चांदीचे दरही घटले आहेत. वायदे बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा दर 800 रुपयांनी घसरला आहे. तसेचर एक किलो चांदीच्या दरमध्येही 1500 रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे येत्या काळात सोनं-चांदी आणखी स्वस्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सोन्या-चांदीच्या किंमतीतील वाढ सातत्याने सुरुच होती. ही वाढ थांबण्याचे नाव घेत नव्हती. आता सोने दरात घसरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, केंद्र सरकारने सोन्यावरील आयात शुल्कात 5 टक्क्यांनी मोठी वाढ केल्यानंतर सोन्याच्या किमतीत दररोज वाढत होती. आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशीही सोने-चांदीच्या दरात वाढ झाली होती. आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली होती. त्यामुळे सोन्याने पुन्हा एकदा 52 हजारांचा पल्ला गाठला होता. एवढेच नाही तर सोन्याच्या फ्युचर्स किमतीने दोन महिन्यांच्या उच्चांकी पातळी गाठली होती.

मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सकाळी 22 कॅरेट शुद्धतेची फ्युचर्स किंमत 48,100 आहे. तर 24 कॅरेट सोने 52,470 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर चांदीची किंमत 362 रुपयांनी वाढून 58,850 रुपये प्रति किलोवर पोहोचली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *