महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – नवी दिल्ली : आरोग्य मंत्रालयाकडून शनिवारी सकाळी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात आत्तापर्यंत करोनाबाधित रुग्णांची संख्या १४,३७८ वर पोहचलीय. यात ७६ परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. दरम्यान, यातील १९९२ रुग्णांनी करोनावर यशस्वीरित्या मात केलीय तर ४८० जणांनी आपला जीव गमावलाय. सध्या, देशातील वेगवेगळ्या रुग्णालयांत ११,९०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
हेल्पलाईन क्रमांक
करोनाशी संबंधीत कोणतीही माहिती मिळवण्यासाठी +९१-११-२३९७८०४६ या क्रमांकावर फोन करा. याशिवाय राज्यांनीही आपले हेल्पलाईन क्रमांक जारी केलेले आहेत