महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई: महाराष्ट्रासाठी कोरोनाच्या संकटात दिलासा देणारी बातमी. राज्यातल्या कोरोनाबाधित बळींची संख्या २०१ वर पोहोचली आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या २ हजार ८५ झाली असून, १२२ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत नव्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने ही दिलासादायक बाब आहे. शुक्रवारी ३१ तर राज्यात आतापर्यंत एकूण ३३१ रुग्ण पूर्णपणे बरे झालेत. या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.राज्यात शुक्रवारी दिवसभरात केवळ ११८ रुग्ण वाढले. तर मुंबईत केवळ १२ नव्या रुग्णांची भर पडली. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३ हजार ३२० वर पोहोचली आहे. तर शुक्रवारी ७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यात सातपैकी ५ जण मुंबईतले होते. त्यांना हाय ब्लड प्रेशर, डायबेटीजचाही त्रास होता.
गेल्या आठवड्याचा विचार करता राज्यात केवळ ११८ रुग्ण वाढले आहेत. ही दिलासा देणारी बाब आहे. कोरोनाची साखळी मोडून काढण्यात यश येत आहे. तर मुंबईत केवळ १२ रुग्ण वाढले असून पुणे महापालिकेच्या क्षेत्रात २९ रुग्ण वाढले आहेत.