‘स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कोठडीचा इतिहास जाणून शहारून गेलो’; अमित ठाकरेंची पोस्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ जुलै । महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे ‘मनविसे पुनर्बांधणी महासंपर्क अभियान’ राबवत असून ते कोकण दौऱ्यावर आहेत. आज अमित ठाकरे यांनी रत्नागिरीमधील विशेष कारागृहातील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती कक्षाला भेट दिली.

अमित ठाकरे फेसबुकवर पोस्ट करत म्हणाले की, रत्नागिरी शासकीय विश्रामगृहात भेटायला आलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी श्री. अमेय पोतदार यांच्या आग्रहास्तव रत्नागिरी विशेष कारागृहात गेलो. तिथल्या सावरकर स्मृती कक्षात गेल्यानंतर, त्या कोठडीचा इतिहास जाणून घेतल्यानंतर शहारून गेलो, असं अमित ठाकरे म्हणाले.

अंदमानला काळया पाण्याची शिक्षा भोगल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी १९२१ ते १९२३ अशी दोन वर्षं ज्या तुरुंगाच्या अंधाऱ्या खोलीत दंडा-बेडी लावून डांबून ठेवलं होतं, त्याच जागी काही मिनिटं मी उभा होतो. कोकणात पर्यटनासाठी येणाऱ्यांनी या कारागृहातल्या सावरकर स्मृती कक्षाला भेट द्यायलाच हवी. इथे आपला इतिहास आहे. जुलुमाविरोधात लढण्याचं महाप्रचंड बळ देणारी प्रेरणा इथे आहे. त्या प्रेरणेचं नाव म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर, असं अमित ठाकरेंनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *