सावध व्हा ! कोरोना आता ‘या’ मार्गाने येतोय, सरकारने लक्ष घालावे ; मनसेचं केंद्राला पत्र

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन – मुंबई – राज्यात तसेच देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणतीही आस्थापने सुरु करण्याची परवानगी नाही. रेल्वे, विमान वाहतूक सेवा ठप्प आहे. मात्र सागरी वाहतूक अद्यापही सुरु असल्याचं मनसेने सांगितलं आहे.

यासाठी मनसेच्या नाविक सेना युनियनमार्फत केंद्र सरकारच्या जहाज आणि बंदरे विभागाला पत्र पाठवण्यात आलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलंय की, नोवेल कोरोना व्हायरसने सागरी दळणवळणातदेखील प्रवेश केला आहे. दुबई येथील नौकेतल्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालेली असल्याने त्यांची आपत्कालीन सुटका करण्यात आली आहे. भारतात तर मोठी बंदरे आहेत. सागरी मार्गाने कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी भारतीय बंदरावर येणाऱ्या प्रत्येक नौकेतील कामगार, कर्मचारी-अधिकारी यांची कोरोनाची चाचणी करण्यात यावी. त्यांना सक्तीने १४ दिवस क्वारंटाईन करण्यात यावं तसेच संबंध नौकेचे सॅनिटायझेशन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच आपल्या एका नजर चुकीमुळे समाजात कोरोनाचे वावटळ उठणे अहितकर ठरेल. बीपीटी अंतर्गत सर्व सागरी किनाऱ्यावरील जहाजे, हद्दीत उभी असणारी परदेशी जहाजे यावरील कामगारांची तातडीने तपासणी करण्यात यावी. त्यामुळे केंद्राची खबरदारी सागरी व्यवसायाला सुरक्षित ठेवू शकते असं या पत्रात म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *