कोरोना जर जाणिवपूर्वक पसरवला असेल तर चीनला याचे परिणाम भोगावे लागतील; ट्रम्प यांचे चीनला आव्हान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन – वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसप्रकरणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनना खुले आव्हान दिले आहे. कोरोना जाणिपूर्वक पसरवला असेल चर चीनला याचे परिणाम भोगावे लागतील असे ट्रम्प म्हणाले आहेत. शनिवारी पत्रकारांशी बोलताना हे विधान केले. जर ही चूक असेल तर चूक ही चूक असते. पण कोरोना जर जाणिवपूर्वक पसरवला असेल तर चीनला याचे परिणाम भोगावे लागतील.

वुहानमध्ये कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचे आकडे समोर आणले. यानंतर चीनवर जगभरातून टीका होत आहे. चीनने जाहीर केलेले मृतांचे आकडे पारदर्शक नसल्याचे सांगत ट्रम्प आणि त्यांचे ज्येष्ठ सहकाऱ्यांनी टीका केली. चीनमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्युच्या संख्येवर देखील ट्रम्प यांनी शंका घेतली. आमच्या लॅबमधून कोरोना निर्माण झाला नसल्याचे वुहानच्या लॅबच्या संचालकांनी सांगितले. चीनने कोरोना पसरवल्याचे आरोप त्यांनी फेटाळून लावले. अशा आरोपातून वाचण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले.

कोरोना व्हायरसचा प्रकोप सुरु असलेल्या अमेरिकेत शुक्रवारी कोरोना रुग्णांच्या संख्येने ७ लाखांचा आकडा पार केलाय. तर 35 हजारांहून अधिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बाल्टीमोर येथील जॉन्स हॉप्किन्स विद्यापिठाने याबाबत माहिती दिली आहे. कोरोना माहामारीचं केंद्र बनलेल्या न्यूयॉर्कमध्ये 14 हजारहून अधिकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 2 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर शेजारील न्यूजर्सीमध्ये 78 हजारांहून अधिक कोरोनाबाधित असून 3800 लोकांचा मृत्यू झाला आहे.

राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत आतापर्यंत 37.8 लाखांहून अधिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. ही संख्या कोणत्याही देशात केलेल्या चाचण्यांपैकी सर्वाधिक आहेत. सर्वात प्रभावित असलेल्या न्यूयॉर्क, लुइसियाना या भागात दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि इतर देशांच्या तुलनेत अधिक लोकांची चाचणी झाली. अमेरिकेत जगातील कोणत्याही देशाच्या तुलनेत अधिक मजबूत, प्रगत आणि अचूक चाचणी प्रणाली असल्याचं ट्रम्प त्यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *