महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ जुलै । राज्यामध्ये नुकतेच शिंदे गट आणि भाजप सरकार (bjp government) स्थापन झाले आहे. सरकारच्या कारभाराला काही दिवस होत नाही तेच भाजपच्या कार्यकर्त्याचा (bjp worker shirikant Deshmukh) प्रताप समोर आला आहे. भाजपा सोलापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख (shrikant deshmukh viral video ) यांचा एका महिलेसोबत हॉटेलमधला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे देशमुखांची थेट हकालपट्टी करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टीचे सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एका महिलेनं देशमुख यांच्यावर अनैतिक संबंध ठेवत असल्याचा आरोप केला आहे. या व्हिडीओ भाजपच्या गोटात एकच खळबळ उडाली.
भाजपचे देशमुख यांच्याकडे तातडीने राजीनामा मागितला. त्यानंतर देशमुख यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी स्वीकारला आहे. प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसार सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा तात्पुरता पदभार सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष विक्रम देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
भाजपचे सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. एका महिलेसोबत 30 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. एका हॉटेलमधला हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जात आहे. हॉटेलमधील रुममध्ये एक महिला रडरडत मोबाईल घेऊन येते आणि सेल्फी व्हिडीओ तयार करते. या व्हिडीओमध्ये ही महिला म्हणते की, या माणसाने मला फसवलं आहे, बायकोसोबत संबंध ठेवून हा माझ्याशी अनैतिक संबंध ठेवतोय, याने मला फसवलं? असं म्हणत मोबाईलचा कॅमेरा तरुणाकडे वळवते. ही व्यक्त श्रीकांत देशमुख असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर त्यांनी धाव घेऊन त्या महिलेच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आता कुठे सरकार स्थापन झाल्यामुळे भाजप जिल्हाध्यक्षाच्या या प्रतापामुळे भाजपच्या वरिष्ठांनी तीव्र संताप व्यक्त केला आणि तातडीने राजीनामा स्विकारला.