महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ जुलै । आंतरराष्ट्रीय बाजारात नॅचरल गॅसच्या वाढलेल्या किमती तसेच घरगुती गॅस सिलिंडर पुरवठा करण्यात येणारी अडचण पाहून वाढती मागणी व पुरवठा यांचा समतोल राखण्यासाठी महानगर गॅस पंपनीने सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या दरात मोठी वाढ जाहीर केली आहे. मध्यरात्रीपासूनच सीएनजी किलोमागे 80 रुपये तर पीएनजीचा दर 48.50 रुपये इतका झाला आहे.
महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात किलोमागे चार रुपये तर आणि पीएनजीच्या दरात प्रतिघनमीटर तीन रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे मुंबई आणि परिसरात 12 जुलैच्या मध्यरात्रीपासून सीएनजीचा दर किलोमागे 80 रुपये तर पीएनजीचा दर 48.50 रुपये इतका झाला आहे. सीएनजीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या वापरापेक्षा अनुक्रमे 51 टक्के आणि 18 टक्के बचत होत असल्याचे महानगर गॅस पंपनीने म्हटले आहे. डोमेस्टिक पीएनजीचा सध्याचा दर डोमेस्टिक एलपीजीपेक्षा कमी असल्याचे महानगर गॅस लिमिटेड पंपनीने म्हटले आहे.