महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ जुलै । ओव्हल मैदानावर झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला. सामन्यात आधी जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडला फक्त ११० धावात गुंडाळले. बुमराहने १९ धावात देत ६ विकेट घेतल्या. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामीच्या जोडीने १० विकेट राखून विजय मिळून दिला. या विजयासह भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
इंग्लंडने विजयासाठी किरकोळ आव्हान दिले होते. भारताची सुरुवात संथ होती. चार षटकात टीम इंडियाने फक्त ८ धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून पाचवे षटक टाकण्यासाठी डेविड विली आला. त्याच्या पहिल्या दोन चेंडूवर धाव घेतला आली नाही. पण तिसऱ्या चेंडूवर रोहितचे रौद्र रुप पाहायला मिळाले. त्याने शॉर्ट पिच चेंडूवर फ्रंट फुटावरूनच बॅकवर्ड स्क्वेयर लेगला षटकार मारला.
— Guess Karo (@KuchNahiUkhada) July 12, 2022
— Guess Karo (@KuchNahiUkhada) July 12, 2022
क्रिकेट विश्वात सर्वांना माहिती आहे की रोहित शर्मला पुल शॉट प्रचंड आवडतो. रोहितचा हा शॉट पाहण्यासारखाच होता. पण या शॉटनंतर सामना पाच मिनिटासाठी थांबवावा लागला. रोहितने मारलेला चेंडू स्टॅड्समध्ये मॅच पाहण्यासाठी आलेल्या छोट्या मुलीला लागला. कॅमेरामॅनने ही घटना मोठ्या स्क्रीनवर दाखवली, तेव्हा सर्वजम सुन्न झाले आणि मॅच थांबवण्यात आली.