महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ जुलै । पुणे शहर आणि परिसरात या चार पाच दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे (Pune Rain) व हवामान विभागाने (Whether Update) गुरुवारी (ता. १४) अतिवृष्टीचा इशारा दिल्याने उद्या (गुरूवारी) पुणे शहरातील सर्व शाळांना (School) सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने (Pune Corporation) हा निर्णय घेतला आहे. याशिवाय पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळेला तसेच खाजगी शाळेला सुट्टी जाहीर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत. (Pune School News In Marathi)
संततधार पावसामुळे पुण्यातील जनजीवन विस्कळीत झालेले आहे. रस्त्यांना पडलेले खड्डे त्यामुळे वाहतूक कोंडीचा मोठी समस्या निर्माण झालेली आहे. रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत आहेत, अनेक ठिकाणी रस्त्यांमध्ये पाणी जमा झाल्याने वाहन चालकांची तारांबळ उडत आहे. अशी स्थिती असताना त्यातच आता हवामान विभागाकडून पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा (Pune Rain Alert) देण्यात आलेला आहे.
मुसळधार पाऊस असताना विद्यार्थ्यांच्या शाळेत पोहोचताना अनेक अडचणी येत आहेत. स्कूलबस, व्हॅन विद्यार्थ्यांना घेण्यासाठी आणि शाळा सुटल्यानंतर घरी सोडण्यासाठी ही विलंब होत आहे. अतिवृष्टीमुळे शालेय विद्यार्थ्यांना कोणताही फटका बसू नये यासाठी पुणे महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. (Maharashtra Rain Update)
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विलास कानडे म्हणाले, “हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे गुरुवारी शहरातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे. त्याबाबतचे परिपत्रक काढले जाईल. शुक्रवारी शाळा सुट्टी द्यायची की नाही याबाबतचा निर्णय गुरुवारी आढावा घेऊन घेतला जाईल.
पिंपरी चिंचवड क्षेत्रात सद्यस्थितीत मुसळधार पाऊस पडत असून येत्या दोन दिवसात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्यामार्फत वर्तवण्यात आलेली आहे.त्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रातील बालवाडी / प्राथमिक / माध्यमिक तसेच सर्व खाजगी शाळेना (अनुदानित, विनाअनुदानित, अंशत : अनुदानित) ता. १३ ते १४ जुलै पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात येत आहे, असे आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे.