महाराष्ट्र 24: प्रतिनिधी: सलमान मुल्ला : कळंब:- नगरपालिका निवडणुक तारीख जाहीर झाली असून निवडणुकीच्या अनुषंगाने कालपासून आचारसंहिता लागू झाली आहे .
कळंब नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी १८ ऑगस्ट रोजी मतदान तर १९ ऑगस्टला मतमोजणी होणार आहे . १० प्रभागातून २० नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत .
डिसेंबर २०२१ रोजी मुदत संपलेल्या कळंब नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने प्रभाग रचना प्रारूप मतदार याद्या व आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाली असून यावर अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत ऑगस्ट दुपारी ३ वाजेपर्यंत असणार आहे . यासह १८ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ७ वा . ३० मी . ते सायंकाळी ५ वा . ३० मी . पर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे .
२०२१ च्या जनगणनेप्रमाणे कळंब शहराची लोकसंख्या २५७१३ आहे. त्यात १० प्रभाग करण्यात आले आहेत.
येणाऱ्या निवडणुकीत एकूण 20 सदस्य निवडून द्यायचे आहेत . १ ते १० प्रभागात २ नगरसेवक असे २० नगरसेवक निवडून द्यायचे आहेत..
त्या अनुषंगाने विविध राजकीय पक्षांकडून उमेदवार आणि मतदारांची सुरु झाली असून सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या कळंब नगरपालिका भावी नगरसेवक रात्रीपासून कामाला लागल्याचे दिसून आले . परंतु मतदार राजा कोणाला कौल देणार हे लवकरच होणार आहे .
*अशी आहे वार्डनिहाय लोकसंख्या*
प्रभाग-१ मध्ये २३३८
प्रभाग-२ मध्ये २५८५
प्रभाग-३ मध्ये २५९७
प्रभाग-४ मध्ये २५८७
प्रभाग-५ मध्ये २८००
प्रभाग-६ मध्ये २३८४
प्रभाग-७ मध्ये २३३१
प्रभाग-८ मध्ये २७९८,
प्रभाग ९-मध्ये २७३४
प्रभाग-१० मध्ये २५५९
अशी लोकसंख्या आहे.