गुरुपौर्णिमा (Gurupurina 2022) ; बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नतमस्तक !

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ जुलै । गुरुचं स्थान प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचं स्थान महत्त्वाचं असते. आपल्या गुरुप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे गुरुपौर्णिमा (Gurupurina 2022). या निमित्तानेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (balasaheb Thackery) यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन आशिर्वाद घेतली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी शिवाजी पार्कवर बाळासाहेबांच्या दर्शनासाठी पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत औरंगाबादचे आमदार संजय शिरसाठ सुद्धा हजर होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी फुलं वाहून बाळासाहेबांचे आशिर्वाद घेतले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

‘बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर सगळे जण नतमस्तक होत असता. प्रत्येक शिवसैनिकांमध्ये वेगळी भावना असते. आज त्यांच्या आशिर्वादांमुळे माझ्यासारखा साधा शिवसैनिक मुख्यमंत्री म्हणून काम करत आहे. बाळासाहेबांनी जो काही विचार दिला आहे. तो विचार पुढे नेण्याचे काम मी आणि माझ्यासोबत असलेले 50 आमदार नेणार आहे, असा निर्धार एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलून दाखवला.

‘बाळासाहेबांनी शिवसैनिकांनी ताट मानेनं जगण्याची दिशा दिली. या राज्यात आमचे युती सरकार हे चांगले काम करेल. राज्याचा विकास, शेतकऱ्यांचा विकास आणि गोर-गरिबांचा कल्याण करण्यासाठी आम्ही काम करणार आहे. बाळासाहेबांचे आशिर्वाद आमच्यासोबत आहे’ असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

‘मी गेल्या अनेक वर्ष न चुकता हजारो शिवसैनिक ठेंभी नाक्यावर आनंद दिघे यांना अभिवादन करत असतात. मी सुद्धा तिथे चाललो आहे, असंही शिंदे यांनी सांगितलं.राज्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. संपूर्ण जिल्ह्यातील पुरपरिस्थितीवर आम्ही नजर ठेवून आहोत. प्रत्येक जिल्ह्याधिकाऱ्यांना आदेश देऊन ठेवण्यात आले आहे. पूरग्रस्त भागात अतिरिक्त मदत पोहोचवण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहितीही शिंदेंनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *