महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ जुलै । कळंब । सुदिपकुमार देवकर । याबाबत सविस्तर माहिती अशी की, उस्मानाबाद जिल्हात सर्वात मोठी बाजारपेठ हि कळंब आहे तालुक्यातील सर्वच खेडेगाव कळंब बाजारपेठेवर अवलंबून आहेत. कळंब शहरातील बहुसंख्य लोक हे छोटामोठा व्यवसाय करतात परंतु शहरातील काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती या छोट्या दुकानदाराकडे (चहा दुकानदार, फळ दुकानदार ईत्यादी दुकानदारांची ) हप्ता मागणी करतात. जर दुकानदारांनी हप्ता देण्यासाठी नकार दिल्यास गुंड प्रवृत्तीच्या या व्यक्ती त्यांना नाहक त्रास देतात. परंतु पोटाची खळगी भरण्यासाठी हे छोटे छोटे दुकानदार मजबुरी ने अश्या गुंडाना हप्ता देतात. यामुळे शहरातील छोटे दुकानदार हे निराश झालेचे चित्र पाहायला मिळते आहे.
परंतू या साऱ्या गोष्टींना न घाबरून या छोट्या दुकानदारांनी शासनाकडे रितसर तक्रार द्यावी असे आवाहन कळंब चे युवा नेते इस्तियाक तारेख काझी यांनी केले आहे.