महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ जुलै । पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करण्याचा निर्णय गुरुवारी महाराष्ट्र सरकारनी घेतला. पेट्रोलच्या दरात 5 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 3 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा आता सर्वसामान्यांना होणार आहे. (Petrol-Diesel Price Update)
केंद्राने दीड महिन्यापूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्या होत्या. केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरील कर 8 आणि 6 रुपयांनी कमी केले होते. यानंतर महाराष्ट्र सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला होता.आता पुन्हा पेट्रोलच्या दरात कपात झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळालाय.
आज मध्यरात्रीपासून पेट्रोल, डिझेलचे नवीन दर राज्यात लागू करण्यात आले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे आज मुंबईत पेट्रोल 106.25 तर, डिझेल 94.22 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. गुरुवारी मुंबईत पेट्रोलची किंमत 111.30 रुपये तर डिझेलची किंमत 97.22 रुपये प्रति लिटर होती.
राज्यातील काही महत्त्वाच्या शहरातील नवे दर
मुंबईत पेट्रोल 106.25 तर, डिझेल 94.22 रुपये प्रति लिटर
नागपुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.08 रुपये तर डिझेलचा दर 95.59 रुपये प्रति लिटर आहे.
पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 110.88 रुपये तर डिझेलचा दर 95.37 रुपये प्रति लिटर
नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 111.74 रुपये तर डिझेलचा दर 96.20 रुपये प्रति लिटर
कोल्हापुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.34 रुपये तर डिझेलचा दर 95.84 रुपये प्रति लिटर
या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल डिझेलच्या किमती तपासू शकता