महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ जुलै । भारतीय रुपयात घसरण सुरूच आहे. गुरुवारी रुपयाची किंमत 1 अमेरिकी डॉलरच्या तुलनेत 80 रुपयांपर्यंत पोहोचली. भारतीय चलन 18 पैसे कमकुवत होऊन डॉलरच्या तुलनेत79.99 रुपयांवर बंद झाले. रुपया गेल्या 5 वर्षांत डॉलरच्या तुलनेत 19% पर्यंत कमकुवत झाला.
रुपयात 6.8% ची घसरण गेल्या एका वर्षात आली. म्हणजे, विदेशातून येणारी सामग्री गेल्या एका वर्षात आपोआप 6.8% महाग झाली. सरकारी तेल कंपन्या डॉलरमध्ये देयक देऊन कच्चे तेल घेतात. त्यामुळे इंधन महाग होऊ शकते.विदेशात शिकणाऱ्या मुलांच्या पालकांनाही जास्त रुपये मोजावे लागतील. मोबाइल, ऑटो पार्ट्स आदीही महाग होऊ शकतात.