महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ जुलै । स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख आणि पदाधिकाऱयांची बैठक घेतली. या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, लढाईसाठी तयार राहा, शिवसेनेचे 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारणाचे सूत्र कायम लक्षात ठेवा. पक्षाचे संघटन तळागाळात आणि गावागावात अधिक मजबूत करण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
नगरपालिका निवडणुकांसाठी आघाडी करण्याचे निर्णय हे स्थानिक पातळीवर घ्या. स्थानिक पातळीवर बूथप्रमुखांच्या तसेच निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या नियुक्त्या करण्यात याव्यात, असे आदेशही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले.