उद्धव ठाकरे लोकसभेत विजय मिळवून देऊ शकत नाहीतः खासदार राहुल शेवाळे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ जुलै । ‘सन २०२४च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे विजय मिळवून देऊ शकत नाहीत. त्यांनी भारतीय जनता पक्षाशी युती करणे आवश्यक आहे’, असे मत बंडखोर शिवसेनानेते खासदार राहुल शेवाळे (rahul shewale) यांनी गुरुवारी व्यक्त केले.

शिवसेनेत फूट पडण्याआधी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या अनेक बैठकांमध्ये पुढील लोकसभा निवडणुकीत नेतृत्वाचा मुद्दा बंडखोर नेत्यांनी उपस्थित केला होता. ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीमध्येही आगामी लोकसभा निवडणुकीत नेतृत्वाबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. त्या बैठकीत संजय राऊत यांनी ठाकरे यांच्याकडे इशारा केला होता. त्यावेळी, मी ठाकरे यांचा आदर करतो, मात्र आपण वास्तववादी असले पाहिजे, असे त्यांना सांगितले होते. उद्धव हे लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा चेहरा असूच शकत नाहीत, असे सांगितल्याचे शे‌वाळे म्हणाले.

‘अनेक मतदारसंघांत विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांशी शिवसेनेने युती करणे, हा अत्यंत गुंतागुंतीचा मामला आहे. लोकसभा निवडणुकीत यूपीएचे नेते म्हणून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवणे हे आम्हाला कदापि मान्य होणारे नाही’, असेही शेवाळे म्हणाले. शिवसेनेतील बहुसंख्य नेते भाजपशी युती करण्याच्या बाजूने आहेत आणि त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याची इच्छा आहे, असेही शेवाळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *