महाराष्ट्र २४- ऑनलाईन – मुंबई : कोरोना व्हायरसने थैमान घातल्यामुळे देशभरात ३ मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. लॉकडाऊनच्या या काळात महाराष्ट्रात परराज्यातले जवळपास ६ लाख कामगार आणि मजूर अकडले आहेत. या कामगारांना त्यांच्या राज्यात परत पाठवण्यासाठी स्पेशल ट्रेन सुरू करण्याचा विचार करा, असं आवाहन मुख्यमंत्री यांनी पंतप्रधान यांना केलं आहे.परराज्यातील अडकलेल्या कामगार व मजुरांना त्यांच्या मुळगावी पाठविण्यासाठी स्पेशल ट्रेनची व्यवस्था करता येईल का याचा केंद्राने विचार करावा, एप्रिल अखेरपर्यंत याबाबत गाईडलाईन निर्गमित करण्याची मागणी प्रधानमंत्री व रेल्वे मंत्रालयाकडे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे.
परराज्यातील अडकलेल्या कामगार व मजुरांना त्यांच्या मुळगावी पाठविण्यासाठी स्पेशल ट्रेनची व्यवस्था करता येईल का याचा केंद्राने विचार करावा, एप्रिल अखेरपर्यंत याबाबत गाईडलाईन निर्गमित करण्याची मागणी प्रधानमंत्री व रेल्वे मंत्रालयाकडे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 21, 2020

परराज्यातील जे कामगार महाराष्ट्रात अडकले आहेत. त्यांची निवारा केंद्राच्या माध्यमातून उत्तम व्यवस्था केली जात आहे. साधारणत: ६ लाख स्थलांतरीत कामगार आणि मजुरांची जेवणाची आणि इतर व्यवस्था केली आहे, त्यांची जबाबदारी राज्य शासनाने घेतली आहे तरी ते लोक त्यांच्या घरी जाऊ इच्छितात, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.काही वेळा हे कामगार आणि मजूर आंदोलनाच्या पवित्र्यात येतात. जर ३० एप्रिल नंतर १५ मे पर्यंत विषाणुचा प्रादुर्भाव वाढण्याचा अंदाज केंद्र सरकार व्यक्त करत असेल, तर आता हातात असलेला कालावधी लक्षात घेऊन यासंदर्भात विचार करावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.