मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी ‘शिवसेना पक्षप्रमुख’ म्हणणं टाळलं ! बंडखोरांनी मात्र उद्धव ठाकरेंना थेटच म्हटलं..

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ जुलै । महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आज 62 वा वाढदिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या पोस्टमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केवळ माजी मुख्यमंत्री असा केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख करणं एकनाथ शिंदे यांनी टाळलं आहे. एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी आई जगदंबेचरणी प्रार्थना असे म्हणून त्यांचे अभिष्टचिंतन केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करताना शिवसेना पक्षप्रमुख म्हणणं टाळलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी जरी उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्षप्रमुख म्हणणं टाळलं असलं तरी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या अनेक बंडखोर नेत्यांनी मात्र उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देताना त्यांचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख असा केला आहे. माजी मंत्री गुलाबराव पाटील, शिवाजी आढळराव पाटील, धैर्यशील माने यांच्यासह काही बंडखोर नेत्यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देताना त्यांच्या नावाआधी शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *