‘बाळासाहेबांना फोनवरून शब्द दिला होता…………… ‘; केंद्रीय मंत्री नारायण राणे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ जुलै । मी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर १-२ वर्षांनी बाळासाहेबांचा फोन आला. मी कणकवलीच्या घरी होतो. माझा नेपाळी सेवक आहे त्याच्या फोनवर आला होता. बाळासाहेबांच्या घरी थापा सेवक होता त्याने त्याच्या फोनवरून केला होता. तो सेवक धावत आला म्हणाला साहेबांचा फोन आहे. मी विचारलं कोण साहेब, तर मातोश्री सांगितले. मी फोन घेतला. समोरून बाळासाहेब बोलले जय महाराष्ट्र, मीपण म्हटलं जय महाराष्ट्र, काय करतोय, सगळ्यांची चौकशी केली. सगळे कसे आहेत असं विचारलं. साहेबांनी मला सांगितले शिवसेनेत आपण हे केले. तूपण भरपूर काय केले मी विचारलं साहेब तुम्हाला अपेक्षित काय आहे? मी तर पुन्हा येणार नाही परंतु तुम्हाला अपेक्षित काय आहे असं विचारल्यावर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंबाबत एक शब्द माझ्याकडून घेतला. ते मी इथं सांगणार नाही. माझ्याबाबत ते काहीही बोलले तरी वाकड्या नजरेने मी त्यांच्याकडे पाहणार नाही. माझ्या सुपाऱ्या उद्धव ठाकरेंनी दिल्या होत्या. परंतु मी काहीही करणार नाही असं बाळासाहेबांना शब्द दिला होता.

उद्धव ठाकरेंना खोचक शुभेच्छा
माननीय उद्धवजी, तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तुम्हाला उत्तम आणि दिर्घायुष्य मिळो, आमच्यासारख्या साहेबांच्या कडवट कार्यकर्त्याची सुपारी देण्यासाठी हे आयुष्य तुम्हाला उपयोगी पडो. माझ्यासारखे शिवसैनिक तुम्हाला पुरुन उरतील हेदेखील उद्धव ठाकरेंनी लक्षात घ्यावं अशा शब्दात नारायण राणेंनी खोचक शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *