Uddhav Thackeray: त्यांना गद्दार कुठे बोललो? उद्धव ठाकरेंनी बंडखोरांसाठी वापरला दुसराच शब्द

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ जुलै । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सामनातील मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रकाशित झाला आहे. पहिल्या भागात त्यांनी भाजपा आणि बंडखोरांवर जबरी टीका केली होती. त्यानंतर, दुसऱ्या भागातही त्यांनी नाव न घेता एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. आजच्या मुख्यमंत्र्यांची भरसभेतही नाटके पहा. भाजप किती भयंकर म्हणून त्यांनी भरसभेत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. ती क्लिप फिरतेय. माझ्याच समोर त्यांनी तो राजीनामा दिला होता, अशी आठवण उद्धव ठाकरेंनी करुन दिली. तसेच, गद्दार या शब्दाबद्दलही उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले.

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी नको, आपण भाजपसोबत जाऊ, अशी भूमिका घेत शिवसेनेतून फारकत घेतली. त्यानंतर राज्यात सत्तांतर होऊन बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे, शिवसेनेकडून त्यांच्यासह बंडखोर आमदार-खासदारांना गद्दार असे संबोधले जात आहे. विशेष म्हणजे आदित्य ठाकरे आपल्या प्रत्येक सभेत बंडखोरांचा उल्लेख गद्दार असाच करताना दिसन येते. राज्यात सर्कस सुरु झालं आहे. गद्दार हा गद्दारच असतो. मूळ शिवसैनिक इथेच आहे. ज्यांनी गद्दारी केली ते निघून गेले, अशी टीका आदित्य यांनी केली. तसेच राजीनामा देण्याची हिंमत असेल तर द्या आणि पुन्हा निवडून या, असं आव्हानही त्यांनी बंडखोरांना दिलं आहे. तर, आदित्य यांनी गद्दार असा शब्दप्रयोग करू नये, अशी भावना बंडखोर आमदारांची आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना मुलाखतीत प्रश्न विचारला होता.

जे फुटीर लोकं आहेत, त्यांनी आपल्याला विनंती केली आहे की त्यांना गद्दार म्हणू नका? असा प्रश्न राऊत यांनी मुलाखतीच्या शेवटी विचारला होता. त्यावर, विश्वासघातकी बोललो ना त्यांना गद्दार कुठे बोललो? म्हणून आज विश्वासघातकी शब्द वापरलाय. त्यांचा पण मान ठेवला मी. म्हणून त्यांना विश्वासघातकी बोललो, गद्दार नाही बोललो, असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले. जय हिंद जय महाराष्ट्र…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *