महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ जुलै । माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)ज्या विधान परिषदेच्या (Vidhan Parishad Maharashtra) जागेचा राजीनामा दिला त्यावरून भविष्यात रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. तसेच शिंदे गटात देखील त्यामुळे नवीन वाद निर्माण होऊ शकतो. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या विधानपरिषद सभासत्वाचा देखील राजीनामा दिला होता. त्यामुळे सध्या विधान परिषदेमध्ये राज्यपाल नियुक्त 12 आमदारांसोबत आणखीन एक जागा रिकामी आहे. ही जागा कोणाच्या पारड्यात पडणार असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. जर ती जागा भाजपकडे गेली तर जास्त काही वाद होतील असे वाटत नाही. मात्र शिंदे गटाकडे आली तर मात्र होऊ शकतात.
शिंदे गटाकडे आलेल्या त्या एका विधान परिषदेच्या जागेवर अनेक निष्ठावंताचा डोळा आहे. सध्या ज्या शिवसेना नेत्यांना एकनाथ शिंदे भेटत आहेत त्यापैकी काही जण तर आहेतच पण जे ज्यांनी कशाचीही अपेक्षा न ठेवता एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला त्यांची देखील इच्छा या जागेसाठी असू शकते. यातच एक नाव म्हणजे रामदास कदम. सध्या रामदास कदम यांचा मुलगा शिंदे गटात आहे मात्र त्यानंतर अचानक रामदास कदम सर्वांसमोर आले.