Manohar Joshi: मनोहर जोशींच्या घरातून बाहेर पडताच एकनाथ शिंदेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ जुलै । शिवसेनेचे आमदार, खासदार आणि नगरसेवक फोडल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांन संपूर्ण पक्ष ताब्यात घेण्यासाठी वेगवान हालचाली सुरु केल्या आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गुरुवारी शिवसेनेतील ज्येष्ठ पण अलीकडच्या काळात सक्रिय राजकारण आणि संघटनेपासून दूर सारल्या गेलेल्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. आज सकाळी एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे (Shivsena) बुजुर्ग नेते लीलाधर डाके यांना भेटले होते. त्यानंतर संध्याकाळी एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील शिवसेनेचे पहिल्या फळीतील नेते असणारे मनोहर जोशी यांची भेट घेतली. या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सूचक वक्तव्यही केले. (CM Eknath Shinde meets Shivsena vetern leader Manohar Joshi in Mumbai)

Adv: वंडर वुमन फेस्टमध्ये Biba, Vero मोड आणि अधिक ७०% पर्यंत सूट सारखे टॉप ब्रँड एक्सप्लोर करा, आता ३० जुलैपर्यंत लाइव्ह, सर्वोत्तम ऑफरसाठी आता खरेदी करा

तुम्ही शिवसेना पक्ष ताब्यात घेण्यासाठी शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांना आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करत आहात का, असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर एकनाथ शिंदे यांनी थेट उत्तर देणे टाळले. पण ज्येष्ठ नेत्यांच्या सदिच्छा आणि शुभेच्छाच माझ्या कामी येतील, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. त्यामुळे एकेकाळी शिवसेनेच्या राजकारणाची सूत्रे हाताळणाऱ्या मनोहरपंतांनी एकनाथ शिंदे यांना नेमका काय सल्ला दिला असावा, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

यावेळी एकनाथ शिंदे हे सतत या भेटीचा आणि राजकारणाचा काहीही संबंध नसल्याचे सांगत होते. मात्र, उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच एकनाथ शिंदे यांनीही अलीकडच्या काळात मनोहर जोशी किंवा लिलाधर डाके यांची आवर्जून म्हणावी अशी भेट घेतली नव्हती. त्यामुळे या भेटींमागे राजकारणच असल्याची चर्चा आहे. परंतु, एकनाथ शिंदे यांनी ही भेट केवळ सदिच्छा भेट असल्याचा दावा केला आहे. लीलाधर डाके आणि मनोहर जोशी हे आमचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केले आहे. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. याच लोकांसोबत मी इतकी वर्षे काम केले आहे. या लोकांनी प्रतिकूल परिस्थिती शिवसेना वाढवली. त्यामुळे आता मुख्यमंत्री झाल्यानंतर मी त्यांना भेटून मार्गदर्शन घेत आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

या भेटीवेळी मनोहर जोशी यांनी एकनाथ शिंदे यांना एक पुस्तिकाही भेट दिली. या पुस्तिकेत शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळातील ६० घोषणांचा समावेश होता. मनोहर जोशी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा करून या घोषणा निश्चित केल्या होत्या. यापैकी अनेक घोषणा उत्तम असून आम्ही त्यांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करु, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *