महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ जुलै । गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,100 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,380 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,130 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,410 रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,130 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,410 रुपये इतका असेल. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47,130 आहे तर प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 51,410 रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 565 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.