महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ जुलै । शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची ईडीची चौकशी सुरू आहे. तर दुसरीकडे, राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे भोसरी गैरव्यवहार प्रकरणात जेलमध्ये जातील, हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे, अशी टीका भाजप नेते गिरीश महाजन यांनी केली,
महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर ईडीची पिडा कायम आहे. राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्या भोसरी प्रकरणाची पुन्हा एकदा लाचलुचपत विभागाकडून पुन्हा एकदा चौकशी होणार आहे. याच प्रकरणावर गिरीश महाजन यांनी भाष्य केलं आहे.
भोसरी प्रकरणात प्रचंड अनियमितता आहे, त्यामुळं खडसेंची जेलवारी अटळ आहे. भोसरी प्रकरणात खडसेंचे जावई गिरीश चौधरी हे जेलमध्ये आहेत, त्यांना जामीन मिळत नाही. बोगस कंपन्या स्थापन करून यांनी पैसा वळवला आहे, असा आरोप गिरीश महाजन यांनी केला.
भोसरी गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयाने कोणतीही ॲक्शन घेऊ नये, असे सूचित केले आहे, ते हटल्यानंतर लगेचच खडसेंना जावयासोबत जेलमध्ये जावे लागेल, असे सुतोवाचेही गिरीश महाजन यांनी केले.
दरम्यान, एकनाथ शिंदे सरकारने एकनाथ खडसेंना मोठा झटका दिला आहे. भोसरी एमआयडी भुखंड घोट्याळाचा तपास पुन्हा लाचलुचपत विभागामार्फत होणार आहे. महाविकास आघाडी सरकार असताना खडसे यांना भुंखड घोटाळ्याप्रकरणी क्लिनचिट मिळाली होती. पण आता लाचलुचपत विभागाने घोट्याळाची पुन्हा चौकशीच्या करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे. त्यामुळे खडसेंना मोठा धक्का मानला जात आहे.
मध्यंतरी या प्रकरणात एकनाथ खडसे यांची ईडीने चौकशी केली होती.एवढंच नाहीतर खडसेंचे जावाई गिरीश चौधरी यांना अटकही करण्यात आली होती. या प्रकरणाची आता पुन्हा लाचलुचपत विभागामार्फत चौकशी होणार आहे.