महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१ ऑगस्ट । शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने मध्यरात्रीनंतर अटक केली आहे. संजय राऊतांची रविवारी सकाळपासून चौकशी सुरु होती. अखेर मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली. यावर आता आमदार रवी राणा यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी राऊतांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
रवी राणा म्हणाले, की संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यानंतर मोठ्या प्रमाणात बिल्डरांकडून आणि व्यवसायिकांकडून अवैध पैसा गोळा केला आणि मोठा भ्रष्टाचार केला. याशिवाय महाविकास आघाडी सरकारची स्थापना करण्यासाठी संजय राऊत यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडूनही मोठी रक्कम घेतली होती, असा आरोपही रवी राणा यांनी केला आहे. या पैशांचीही चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.
याशिवाय संजय राऊत यांच्याप्रमाणेच अनिल परब यांनीही अनेक घोटाळे केले आहे आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे राऊतांपाठोपाठ परब यांच्यावरही अटकेची टांगती तलवार असल्याचं भाकीत आमदार रवी राणा यांनी केलं आहे.