कळंंब:- उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ महसूल दिनी ‘सर्वोत्कृष्ट अधिकारी कार्यगौरव’ पुरस्काराने सन्मानित

Spread the love

महाराष्ट्र 24 -जिल्हा प्रतिनिधी- सलमान मुल्ला – उस्मानाबाद:-महसूल प्रशासनात उत्कृष्ट सेवा बजावणा-या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा दर वर्षी १ ऑगस्ट महसूल दिनी पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गुणगौरव करण्यात येतो. यावर्षी उस्मानाबाद जिल्ह्यातील महसूल उपविभागातून कळंबच्या उपविभागीय महसूल अधिकारी अहिल्या गाठाळ यांना ‘सर्वोत्कृष्ट उपविभागीय महसूल अधिकारी’ म्हणून त्यांना पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते उस्मानाबाद येथे त्यांना देऊन त्यांचा सन्मान करुन त्यांच्या कार्याचा गुणगौरव करण्यात आला.

अहिल्या गाठाळ यांनी कळंब महसूल उपविभागीय पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कामकाजात पारदर्शकता निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले असल्याचे दिसून येते. शालेय विद्यार्थ्यांना लागणारे विविध दाखले देण्यासाठी त्यांनी गतीमानता निर्माण केली. यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांच्या वेळेचा अपव्यय टळला. त्याचबरोबर जात प्रमाणपत्रासह अन्य प्रमाणपत्रही विद्यार्थ्यांसह अन्य नागरिकांना वेळेत देण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना महामारीच्या संकटात सापडले होते. अशा कोरोनाच्या लाटेतही न डगमगता निर्भीडपणे त्यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली. ग्रामीण भागातील महसूल प्रशासनातील कर्मचाऱ्यांच्या कामावर बारीक लक्ष ठेवून सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी, शेतमजूर यांची कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न केले असल्याचे दिसून येते. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातील तज्ञासह जानकार नागरिकांतून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *