महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ ऑगस्ट। Gold Rate Today : श्रावण महिन्यात सणवारांसाठी दागिने खरेदीची लगबग असते. या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. सलग दोन दिवस सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स 0.25 टक्क्यांनी घसरून 24 कॅरेट सोन्याचा दर 51,410 रूपयांवर आला आहे. तर, 1 किलो चांदीचा दर 58,020 रूपये आहे. तुमच्या शहरातील आजचे सोने-चांदीचे काय आहेत ते जाणून घ्या.
तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे आजचे दर :
शहर सोने (24 कॅरेट) 1 किलो चांदीचा दर
मुंबई 51,320 57,900
पुणे 51,320 57,840
नाशिक 51,320 57,840
चेन्नई 51,470 58,070
दिल्ली 51,230 57,800
कोलकाता 51,250 57,820