CNG,PNG Price Hike: महागाईचा दणका ! सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी वाढ, चेक करा नवे दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३ ऑगस्ट । महागाई कमी होण्याची वाट पाहणाऱ्या मुंबईकरांना आणखी एक झटका बसला आहे. मुंबईत पुन्हा एकदा सीएजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मुंबईत सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या दरात वाढ झाली आहे. सीएनजीच्या किमतीत प्रति किलो 6 रुपये आणि पीएनजीच्या किमतीत 4 रुपये प्रति एससीएम वाढ झाली आहे.

मुंबईत किमती वाढल्यानंतर आता सीएनजी 86 रुपये प्रति किलो आणि पीएनजी गॅस 52 रुपये 50 पैसे प्रति एससीएम दराने उपलब्ध होणार आहे. महानगर गॅस लिमिटेडने दरात वाढ जाहीर केली आहे. गेलने सिटी गॅस कंपन्यांना पुरवल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूच्या किमती वाढवल्या असून त्याचा बोजा सर्वसामान्य मुंबईकरांवर पडणार आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी गेलने सिटी गॅस कंपन्यांना पुरवलेल्या गॅसशी संबंधित मासिक अहवाल तपासून दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. GAIL ने 1 ऑगस्ट 2022 पासून नॅचरल गॅसची किंमत 18 टक्क्यांनी वाढवून प्रति युनिट 10.5 डॉलर केली आहे. यानंतर आता स्थानिक कंपन्यांनीही सर्वसामान्य ग्राहकांवर बोजा टाकण्यास सुरुवात केली आहे. या दरवाढीनंतर मुंबईकरांना सीएनजीमध्ये 6 रुपये आणि पीएनजीमध्ये 4 रुपये अधिक खर्च करावे लागणार आहेत.

महानगर गॅस लिमिटेडने एका निवेदनात म्हटले आहे की, गॅसच्या किमतीत लक्षणीय वाढ झाल्यामुळे, आम्ही खर्च कव्हर करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणून आम्ही CNG च्या किरकोळ किमतीत 6 रुपये (प्रति किलो) आणि घरगुती PNG (पाइप नॅचरल गॅस) च्या किरकोळ किंमतीत 4 रुपये (प्रति युनिट) वाढ केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *