दमदार पावसाने राज्यातील धरणे निम्म्याहून अधिक भरली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ ऑगस्ट । राज्यात जुलै महिन्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. दरम्यान, राज्यातील धरणांतील उपयुक्त पाणीसाठा निम्म्याहून अधिक म्हणजे ६७ टक्क्यांवर पोचला आहे. गतवर्षी राज्यातील धरणांमध्ये ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुमारे ५५ टक्के इतका पाणीसाठा होता.

सोलापूर जिल्ह्यातील उजनी आणि औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी आणि नाशिक जिल्ह्यातील गिरणा या धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत अधिक पाणीसाठा झाला आहे. पुणे जिल्ह्यात काही अपवाद वगळता धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा आहे. सर्वच धरणे काठोकाठ भरण्यासाठी अजूनही पुरेशा पावसाची गरज आहे.

राज्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा (४ ऑगस्ट २०२२ अखेर)

(टीएमसीमध्ये, टक्केवारी, कंसात गतवर्षीची टक्केवारी) :

जायकवाडी ६९.२३ ९०.२९ (४०.२९)

गोसीखुर्द २३.२५ ३४.१२ (४१)

मुळा १५.४७ ७२ (५५.३३)

गिरणा १६.७० ९०.३२ (३८.६८)

राधानगरी ५.४३ ७० (९९)

दूधगंगा १५.९९ ६६.७० (८२.३१)

वारणा २०.०९ ७३.०८ (८५.३९)

कोयना ६०.६६ ६०.५७ (८०.५६)

उजनी ४३.१५ ८०.५२ (५५.७६)

येलदरी १९.९० ६९.५७ (७४.२५)

मांजरा २.४९ ३९.९६ (२२.४९)

माजलगाव ५.१६ ४७ (३२.२२)

पुणे जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा

(टीएमसीमध्ये, टक्केवारी, कंसात गतवर्षीची टक्केवारी) :

पानशेत ८.४८ ७९.६६ (१००)

वरसगाव ९.३६ ७३ (९१.७९)

खडकवासला १.१८ ५९.८२ (१००)

टेमघर २.१८ ५८.९७ (८२.०२)

पवना ६.८८ ७१.०९ (८०.५८)

भामा आसखेड ७.१५ ९३.२४ (८५.०२)

भाटघर १७.६२ ७५ (८२)

डिंभे १०.२० ८१.६४ (८३.७९)

चासकमान ७.४१ ९७.९२ (१००)

घोड ४.५० ८२.४२ (३४.२७)

माणिकडोह ५.९० ५८ (३८.३७)

नीरा देवघर ७.९९ ६८.१७ (९७.९४)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *