आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना चांगलंच कात्रीत पकडलं ;साधला थेट निशाणा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ ऑगस्ट । शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांनी ज्यांच्या नेतृत्वात बंडखोरी केली त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच आदित्य ठाकरे यांनी थेट निशाणा साधला आहे. ‘हे सरकार निवडणुकीला घाबरत आहे. ज्या नगरविकास मंत्र्यांनी नवीन वार्ड रचना जाहीर केली होती, त्याच नगरविकास मंत्र्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर ती वार्ड रचना रद्द केली, त्यामुळे हे सरकार निवडणुकीला घाबरत असल्याचं स्पष्ट झालं आहे,’ असा हल्लाबोल त्यांनी केला.

मुंबई महानगरपालिका निवडणूक जवळ आल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. पक्षातील फुटीनंतर मुंबईतील सत्ता कायम ठेवण्याचं मोठं आव्हान शिवसेनेसमोर असणार आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं. ‘आपण केलेली कामं घरा-घरापर्यंत पोहोचवा. केलेल्या कामाची माहिती द्या. नवीन मतदारयादीत मतदार राजाची नोंद वाढवा. हे सरकार बेकायदेशीर आहे आणि ते पडणारच आहे. त्यामुळे आपण केलेल्या कामाची माहिती देऊन मतदारराजाला जागृत करा,’ असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *