महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ ऑगस्ट । क्रिकेट जगतात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी आपला देश सोडून इतर देशांकडून क्रिकेट खेळले आहे. अनेक भारतीय खेळाडूंचाही यात समावेश आहे. अनेक भारतीय वंशाचे खेळाडू आजही परदेशी संघात खेळत आहेत. अनेक खेळाडूंनी दोन देशांसाठीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. पण आता एक वेगळी गोष्ट घडताना दिसणार आहे. जो खेळाडू स्वतः ‘टीम इंडिया’कडून खेळला आहे, पण त्याचा मुलगा मात्र इंग्लंडच्या संघाकडून खेळताना दिसणार आहे. या खेळाडूची अंडर-19 संघातही निवड झाली आहे.
भारताचा माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंगचा (R P Singh) मुलगा हॅरी सिंग आता इंग्लंडकडून क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. आरपी सिंगचा मुलगा हॅरी सिंग याची इंग्लंडच्या अंडर-19 संघात निवड झाली आहे. हॅरी सिंगला श्रीलंके विरूद्धच्या अंडर-19 मालिकेसाठी खेळण्यासाठी संधी इंग्लंडच्या अंडर-19 संघाकडून मिळाली आहे.