मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी विनायक राऊत यांचा दावा; म्हणाले – बंडखोर आता एकमेकांच्या उरावर बसतील

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ ऑगस्ट । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारचा आज तब्बल 39 दिवसांनंतर विस्तार होणार आहे. राजभवनाच्या दरबार हॉलमझध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नव्या मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. पण शपथविधीपूर्वीच शिवसेना नेते विनायक राऊत यांनी शिंदे गटाचे 12 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा करून एकच खळबळ उडवून दिली आहे.

विनायक राऊत सोमवारी रात्री पत्रकारांशी बोलताना म्हणाले – ‘अब्दुल सत्तार असो किंवा इतर कोणताही आमदार, शिंदे गटातील ज्या बंडखोर आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही त्यांना ते नेते आता एकमेकांच्या उरावर बसण्यास सुरूवात करतील. त्यामुळे हे मंत्रिमंडळ औटघटकेचे ठरेल यात शंका नाही.’

मंत्रिमंडळात स्थान लागणार नसल्यामुळे सध्या अनेकजण नाराज आहेत. या नाराज आमदारांपैकी 12 जण आमच्या संपर्कात आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.

जुन्या मंत्र्यांना पुन्हा संधी?

माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जे मंत्री होते, त्यांनाही शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय काही नव्या चेहऱ्यांनाही स्थान मिळणार असल्याचे संकेत सत्ताधाऱ्यांकडून देण्यात आलेत. भाजपचा महाराष्ट्रात गुजरात पॅटर्न राबवणार असल्याचे सांगितले जात आहे.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन

मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर 10 ते 17 ऑगस्ट दरम्यान विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन होणार आहे. या पार्श्वभूमीवर हा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. वाढती महागाई, बेरोजगारी, राजकारण्यांच्या कोलांटउड्या या मुद्यांवर हे अधिवेशन चांगलेच वादळी ठरण्याची शक्यता आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *